रशीद शेख यांना सामाजिक सलोखा पुरस्कार   

बंडगार्डन : कोरोना काळात सर्व धर्मीयांना आरोग्याची काळजी घेऊन आणि गरजूंना जीवनावशक वस्तूंचे वाटप करून देऊन लोकांची सेवा केल्याने रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने ईद मिलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख यांचा गौरव करण्यात आला.
 
रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सदस्य अशोक शिरोळे यांच्या उपस्थितीत रशीद शेख यांचा गौरव करण्यात आला. माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख तसेच विविध क्षेत्रात काम करणार्‍यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. 
 
उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या हस्ते वसंतराव साळवे (राजकीय), कासम भाई शेख (सामाजिक), उज्वला पवार (धार्मिक) लक्ष्मी गायकवाड या समाजसेवकांचा गौरव करण्यात आला.यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, लुकमान खान, कणव चव्हाण, अनिल दामजी, लियाकत शेख, रोहित कांबळे, राजेश गाडे, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, नंदू परदेशी, सुंदर पाटोळे, शौकत बागवान, शशांक माने, सुशिल मंडल,प्रविण बनसोडे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक महेंद्र कांबळे यांनी केले. आभार संदीप धांडोरे यांनी मानले.

Related Articles